पुसद शहरात आज दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. शहरात भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते, सदर मिरवणुकीत, समस्त मुस्लिम धर्मगुरू यांच्यासह मुस्लिम बांधवांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. मिरवणुकीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.ईद मिलादुन्नबी निमित्ताने पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.