गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. गुरूवार सायंकाळनंतर मोती तलावात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गणेशमूर्ती विसर्जन सुरू होते. राजघराण्याच्या ऐतिहासिक गणरायाचं देखील राजघराण्याच्या उपस्थितीत विसर्जन करण्यात आले.