भिलदरी तांडा येथे बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी ऋषिकेश भरत चव्हाण यांचे अन्नत्याग उपोषण सुरू आहे.आज दि १० स्पटेंबर रोजी दुपारी एक वाजता माजी आमदार उदयसिंग राजपूत यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली.यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांची माहिती जाणून घेतली.तसेच तहसीलदार, उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.