Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 7, 2025
आज दि 7 ऑक्टोबर संध्याकाळी 5 वाजता छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सातारा गावात महावितरणच्या निष्काळजीपणामुळे एका शेतकऱ्याच्या म्हशीचा विद्युत तारेचा स्पर्श लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतकरी आरिफ पठाण यांच्या मालकीची म्हैस शेतात चरण्यासाठी गेली असता विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने ती जागीच कोसळली. लिंबाच्या झाडाची फांदी महावितरणच्या तारेवर पडल्याने तार खाली वाकली होती. त्यामुळे म्हशीला तारेचा स्पर्श होऊन तिचा तत्काळ मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त