चाळीसगाव: शहरातील घृष्णेश्वर महादेव मंदिर, शास्त्री नगरजवळ असलेल्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एक नंदी (बैल) खड्ड्यात पडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बैलपोळ्यासारख्या महत्त्वाच्या सणाच्या दिवशी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडलेला असतानाही नगरपालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.