23 ऑगस्टला रात्री सात वाजताच्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार महादुला येथील श्रीवास नगर फुलेनगर धम्म कुटी विहार येथे त्यांना पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शेकडो चिमुकले सहभागी झाले होते दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या ठिकाणी भेट देऊन लाकडी बैलाची पूजा करत चिमुकल्यांची संवाद साधला. यावेळी मंडळ प्रशासनातर्फे पालकमंत्री बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला.