शिरुर तालुक्यातील बाभुळसर खुर्द गावच्या हद्दीतून प्लॉटिंग साईटवरील एक लोखंडी कंटेनर अज्ञात चोरट्यांनी क्रेन व ट्रकच्या सहाय्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी नारायण कुंडलिक गोरे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.