उजेड येथे नदीपात्राची आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पाहणी केली. नदी पात्रातील पाण्याचा जोर थोडा कमी झाला असला तरी देखील अद्याप मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह नदीपात्रातून वाहत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना सतर्क राहून काळजी घ्यावी व आवश्यकता भासल्यास तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा.