उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं आज दर्शन घेतले. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे, त्यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी उपस्थित होत्या. मुंबईकरांचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबाग राजा च्या दर्शनासाठी गेल्या दहा दिवसांपासून भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती.