सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील पदमाळे कृष्णा नदी घाटावर गणपती विसर्जनासाठी गेलेला युवक पाण्यात बुडाल्यानंतर अखेर दोन दिवसांनी मृतावस्थेत सापडला. ही घटना ३ सप्टेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास घडली होती.कवलापूर येथील आदित्य चंद्रकांत नलवडे (वय २३) हा युवक गणपती विसर्जनासाठी पदमाळे घाटावर गेला होता. विसर्जन करताना तो पाण्यात उतरला असता जोरदार प्रवाहात अडकून गेला. काही वेळातच दम लागल्याने तो पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच स्पेशल रे