Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 30, 2025
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने निरोप घेतला. त्यांनी शुक्रवार दिनांक२९ऑगस्ट रोजी वैजापूर तालुक्यातील भिसेवाडी येथील विद्यार्थ्यांना विधानभवनाच्या अभ्यासदौऱ्यासाठी नेले आणि त्यांना लोकशाहीच्या कार्याची ओळख करून दिली.