थाळनेर पोलिसांनी अवैध जुगार व हातभट्टीवर मोठी कारवाई करत १२ संशयीतांना अटक करून गावठी दारू बनविण्याचे साहित्यही उद्ध्वस्त केल्याची माहिती 25 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास प्रसिद्धी पत्रकान्वये प्रसार माध्यमांना प्रभारी एपीआय शत्रुघ्न पाटील यांनी दिली आहे. सदरची कारवाई 24 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास तालुक्यातील हिसाळे गावात केली असून या कारवाई जुगाराचे साहित्य व १२०० रुपयांची रोख रक्कम जप्त आणि ३१००रुपये किमतीचा दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य नष्ट करण्यात आले.