आज शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत माणगाव येथे मोफत रुग्णवाहिका सेवा, मोफत दवाखाना, विद्यार्थ्यांसाठी मोफत वही वाटप तसेच नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या प्रसंगी कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले, कोर कमिटी सचिव शिवसेना रायगड विकास शेठ भोगावले, जिजाऊ पोलादपूर तालुकाप्रमुख संतोष मोरे, जिजाऊ पोलादपूर उपतालुकाप्रमुख शिवाजी साळवी, शिवसेना रायगड दक्षिण सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे उपस्थित होते.