तुळजापूर सोलापूर रोडवर मसला पाठी येथे एसटी बस व पिकअपचा भीषण अपघात झाल्याची दुर्घटना २९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली आहे. पिकअप चालक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे, त्याला उपचारासाठी सोलापूर येथील सिविल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.