एटापल्ली तालुक्यातील नागरिकांनी अनेक वर्षांपासून मांडलेली मागणी अखेर पूर्ण झाली आहे. *सायंकाळी ५ वाजता चंद्रपूरवरून एटापल्लीकडे बस सुटावी* ही मागणी फक्त वाहतुकीपुरती नव्हती, तर ती हजारो लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित होती.आरोग्य उपचारासाठी चंद्रपूरला जाणाऱ्या शेकडो नागरिकांना दिवसभर तपासण्या, औषधोपचार आणि औपचारिकता पार पाडल्यानंतर परतण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नसायचा. त्यामुळे वृद्धांना शहरात मुक्काम करावा लागे.