धुळे शहरात ८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ईद-ए-मिलाद मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासन व सिरत कमिटीने नवी नियमावली जाहीर केली आहे. मछली बाजारातून निघणाऱ्या मिरवणुकीत वाहनासह सहभागी होणाऱ्यांना स्थानिक पोलीस ठाण्याची परवानगी आवश्यक असेल. डीजे सिस्टीमच्या वापरास बंदी घालण्यात आली असून तीन फुटांपेक्षा उंच झेंडे नेण्यास मनाई आहे. नागरिकांनी शांतता राखत नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांनी केले.