चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी राहुरी पोलिसांकडून राबविलेल्या विशेष मोहिमे दरम्यान ३० विना नंबर प्लेट गाड्यांवर १४ हजार रूपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी चार गाड्यांची कागदपत्रे अजून पर्यंत गाडीमालकांनी सादर केली नाहीत तर पुढील आठवड्यामधे अल्पवयीन वाहन चालकांवर देखील कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिला आहे.