हैदराबादला कामासाठी जाणाऱ्या मजुरांना घेऊन जाणाऱ्या क्रूझरने एका ट्रकला वेगाने मागून धडक दिली. त्यात एका मजुराचा मृत्यू झाला. हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वर्धा मार्गावर मंगळवारी पहाटे हा अपघात झाला.सत्तू कलवा यादव २३, गाव पलेरी, असे मृताचे नाव आहे. तो टाईल्स फिटिंगचे काम करत होता. त्याच्यासोबत मनोजकुमार यादव २८, मझगाव,व मध्यप्रदेशातील इतर आठ ते दहा मजूर कामासाठी हैदराबादला निघाले होते. या क्रूझरने ते जात होते.