आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सिलेगाव येथे गणपती बाप्पाचे थाटात ढोल ताशाच्या गजरात विसर्जन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा सिलेगाव येथे बाप्पाची प्रतिष्ठापना पारंपारिक पध्दतीने थाटात साजरी झाली. मंडळाने सामाजिक उपक्रम आणि उत्सवाला विशेष तेज दिले. यादरम्यान विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज रविवारी ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येत भाविक भक्तगण, गणेश उत्सव मंडळाचे सदस्य उपस्थित होते.