पेल्हार पोलीस ठाणे हद्दीतील तुंगारफाटा परिसरात एका रेस्टॉरंटमध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे. डॉल्फिन रेस्टॉरंट या रेस्टॉरंटमध्ये काउंटरमध्ये ठेवलेले 1 लाख 38 हजारांची रोख रक्कम आणि मोबाईल चोरीला गेले. आरोपी वेटर देवेंद्र विश्वकर्मा याने ही चोरी केली असून या प्रकरणी रेस्टॉरंट मालकाच्या तक्रारीवरून पेल्हार पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.