पूरस्थिती गंभीर – आमदार विक्रम पाचपुते यांनी केली पाहणी; प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश श्रीगोंदा : गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे घोड व उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पूरस्थिती निर्माण झाली आहे. घोड व भीमा नदीकाठच्या गावांमध्ये पाणी वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी आज दुपारी बारा वाजता प्रत्यक्ष दौरा करून पूरस्थितीची पाहणी केली.