पुसद येथील राष्ट्रीय लोकन्यायालयाच्या माध्यमातून जिल्हा पातळीवर एक ऐतिहासिक तडजोड घडली आहे. गोवा येथे 2019 मध्ये झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या 28 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर स्नेहल हिच्या कुटुंबाला नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून एक कोटी 40 लाख रुपयांची नुकसानभरपाई चेक स्वरूपात मिळाली. या तडजोडीमुळे लोकन्यायालयाची जलद आणि सामोपचाराने न्याय देणारी संकल्पना अधिक बळकट झाल्याचे अधोरेखित झाले.