महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) गोंदिया आगारास आज राजीव गांधी समाज कार्य महाविद्यालय गोंदिया येथील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक भेट दिली. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत प्रत्यक्ष अनुभव देणे आणि महामंडळाच्या कार्यपद्धतीची माहिती करून देणे हा होता. ही भेट गोंदियामधील राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालय गोंदिया च्या समाजकार्य विभागातील बीएसडब्ल्यू , एमएसडब्ल्यू वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती.