खेड तालुक्यातील संगलट येथे असलेल्या बीएसएनएल टॉवर मधून सुमारे दोन लाख वीस हजार रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी २९ जुलै ते ३० जुलै २०२५ या कालावधीत झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.