सांगोला तालुक्यातील जुनोनी या ठिकाणी पोलिसांनी अवैध जुगार अड्डयावर कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी २०,५०,१००,२०० रुपयांच्या चलनी नोटा, जुगार साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई ही ४ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. चोरून जुगार खेळणारा अजित गुळीग वर्ष 32 राहणार गौंडवाडी तालुका सांगोला याच्यावर सांगोला पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.