एका व्यक्तीचे चाकूच्या धाकावर अपहरण करून त्याच्याकडून २५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी मारुंजी येथे घडली आहे.याबाबत लालबाबुकुमार रामइक्बाल प्रसाद (२८, शिंदेवस्ती मारुंजी, मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश सत्यवान तापकीर (२९, ताजणेमळा, चहोली बुद्रुक) याला अटक करण्यात आली आहे.