भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर भाष्य करताना महायुती म्हणून निवडणूक लढण्याचा मानस असल्याचे सांगितले. स्थानिक पातळीवर स्वबळाचे एकमत झाल्यास तसा निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी म्हटले की, काही जणांनी देवेंद्र फडणवीस यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला; मात्र मराठा आरक्षण हे फडणवीस यांनीच दिले असून मराठा समाजाची मनं त्यांनी जिंकली आहेत. मुंबई-ठाण्यातील जनभावना उत्स्फूर्त, विकासाच्या जोरावरच निवडणुका जिंकणार