तेरा मेला रात्री सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे इमामवाडा हद्दीतील रामबाग येथे राहणारे अतुल गाणार यांच्या घरी अज्ञात आरोपीने घरफोडी केली होती.या प्रकरणाचा तपास करीत असताना इमामवाडा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की दोन आरोपी रामबाग परिसरात सोन्या चांदीचे दागिने विकत आहे. पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत तेजस हनुवते व आयुष लखोटे यांना अटक केली. आरोपींकडून सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 35 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.