आज शनिवार, दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशी निमित्त पंढरपूर शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहाचे स्वरूप लाभले. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मिरवणुकीला सुरुवात झाली. शहरातील विविध गणेश मंडळांनी सजवलेल्या मूर्तींसह ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपारिक वेशभूषेत नृत्यावेशात मिरवणूक काढली. आकर्षक रोषणाई व सजावटीमुळे संपूर्ण परिसर मंगलमय झाला होता. पंढरपूरकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मिरवणुकीचा आनंद लुटला. शहरात सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले.