मागील वीस, पंचवीस वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून, मराठा समाज मागणी करत होते, पण आपल्या मराठा समाजाच्या नेत्यांनी, न्याय दिला नाही ही वस्तुस्थिती आहे, शेवटी दुसऱ्यांदा आरक्षण देण्याचे काम हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं, हे मराठा समाजाने विसरून चालणार नाही, अशी माझी मराठा समाजाला विनंती आहे, असे मत बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.