खरीप हंगाम २०२५ मध्ये अतिवृष्टी, दुबार पेरणी आदी कारणांमुळे अनेक शेतकरी ई-पीक नोंदणी करू शकले नाहीत. अशा शेतकऱ्यांना दिलासा देत राज्य संचालक, जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे यांनी शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीसाठी २० सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे.शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी १३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता केले आहे.