गेल्या काही दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी 29 ऑगस्ट रोजी अमळनेर तालुक्यात जोरदार हजेरी लावली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मारवड आणि भरवस मंडळांत अतिवृष्टीसदृश पाऊस झाल्यामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कळमसरे, नीम आणि वासरे यांसारख्या गावांचा संपर्क तुटला.