करमाळ्यातील भोसे येथील ट्रस्टच्या पडीक जागेत शेळ्या चरण्याच्या करण्याच्या तरुणाला मारहाण करत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता खिशातील मोबाईल फोडून नुकसान केले. याप्रकरणी श्रेयश पाटील यांनी या घटनेची नोंद करमाळा पोलिसात केली असून पोलिसांनी हंबीरराव जाधव, शहाजी जाधव आणि सोजरबाई जाधव यांच्यावर गुन्हे नोंद केले आहेत.