संपत्तीच्या जुन्या वादातून मेहकर शहरातील दोन गटात मंगळवारी रात्री हाणामारी झाली. यावेळी चाकुहल्लाही करण्यात आला. यामध्ये दोन जण जखमी झाले. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी दोन्ही गटाच्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यातील तीन आरोपींना मेहकर पोलिसांनी अटक करून बुधवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडली सुनावली.