आगामी दिवसांत येणाऱ्या गणेशोत्सव, ईद -ए-मिलाद व विविध सणाच्या पार्श्वभूमीवर अहेरी पोलीस ठाण्याच्या वतीने, मंगळवारी संध्याकाळी अहेरी व आलापल्लीत रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.निलोत्पल पोलीस अधिक्षक गडचिरोली, अपर पोलीस अधिक्षक गडचिरोली (अभियान) श्री. एम. रमेश , अपर पोलीस अधिक्षक अहेरीश्री. सत्यसाई कार्तीक यांच्या यांच्या मार्गदर्शनात रूट मार्च काढण्यात आला.