आज शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाला आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी भेट दिली याप्रसंगी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला मराठा समाजच्या आरक्षणाला विरोध नाही मात्र मनोज जनाके पाटील यांनी ओबीसी कोट्यातून आरक्षणाचा जो बालहट्ट धरला आहे त्याला आमचा विरोध आहे याने कुणाचेही भले होणार नाही त्यांनी लक्षात घ्यावं आणि सर्वांना सहकार्य करावे असे यावेळी आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी प्रतिपादन केले