अतिवृष्टीने जमीन वाहून जाणं, खरडून जाणं, पीक सडणं असं वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान होतं, पण अहमदपूर (जि. लातूर) तालुक्यात शिंदगी बु. इथंल्या काही शेतकऱ्यांना एका वेगळ्याच संकटाला सामोरं जावं लागतंय. इथं काही शेतकऱ्यांच्या शेतात अतिवृष्टीने नदीला आलेल्या मोठ्या पुरासोबतच मोठमोठे दगड वाहून आले असून संपूर्ण शेत दगडांनी भरलंय.. हे दगड काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च येणार असून याचेही पंचनामे करण्याची आणि त्यासाठीही सरकारने मदत करण्याची गरज आहे. सरकार याची निश्चित दखल घ्यावी, ही विनंती!