नगर पंचायत बेसा-पिपळा च्या सर्व १७ प्रभागचे आरक्षण आज काढण्यात आले .उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते ,मुख्याधिकारी भारत नंदनवार यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. १७ पैकी ९ प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. सर्वसाधारण ५,सर्वसाधारण महिला ३,अनुसूचित जाती १,अनुसूचित जाती महिलांकरिता २,नागरिकांचा मागास प्रवर्ग २, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ३,अनुसूचित जमाती महिला १ अशा प्रकारे आरक्षण घोषित करण्यात आले.