सातारा तालुक्यातील भैरवगड येथे, जमीन खचल्यामुळे येथील कुटुंबीयांना मांडवे येथे पत्र्याच्या शेडमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे, मात्र या ठिकाणी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने, आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे, जमीन खचल्यामुळे 2019 पासून 30 कुटुंब मांडवे येथे राहतात, ही शासनाने तात्पुरती सोय केली आहे, मात्र या ठिकाणी ना पाण्याची व्यवस्था आहे, ना लाईटची, तसेच या ठिकाणी शेतमजुरी शिवाय पर्याय नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.