देवणी शहरातील प्रभाग क्र 17 हा वार्ड नव्या वसाहतीचा आहे.या शहरातील दक्षिणेचा पूर्ण भाग शेतीचा आहे.तिकडे काळ्या मातीचे रस्ते आहेत.परवा झालेल्या पावसामुळे पूर्ण रस्ते चिखलमय झाले आहेत.या रस्त्यावर चालणे म्हणजे कठीण अवस्था आहे.दोन दिवसात शक्य त्या ठिकाणी तात्पुरता मुरूम (खडक) टाकून रस्ते पुन्हा सुरळीत करून देण्याच्या सूचना सबंधित नगर पंचायत प्रशासन व ठेकेदारांना देण्यात आले आहेत..