नांदुरा तालुक्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्यामुळे तालुक्यातील आरोग्यसेवा प्रभावित झाली आहे. नांदुरा तालुक्यातील एकूण १५ कर्मचारी या आंदोलनात सहभागी आहेत.दिनांक १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करा अशी मागणी या आंदोलनकर्त्याचे आहे.