जुन्या तापी पुलावर अवजड वाहनास प्रतिबंधित लोखंडी कमानीला मालवाहू ट्रकने धडक दिल्याने २सप्टेंबर रोजी भीषण अपघात झाला.या अपघातात ट्रकच्या कॅबिनवर बसलेल्या एका मजुराचा मृत्यू झाला तर दोन गंभीर झाले असून जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या अपघातात मोगीलाल भरत भिल वय १८ याचा मृत्यू झाला तर गोपाल शामा भिल २४ व लहू बारकु भिल १८ हे जखमी झाले.ते तिघेही शिरपूर तालुक्यातील आढे येथील रहिवासी आहेत.