जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण, तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल यमगरवाडी येथे 27 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता शिवाजी मल्हारी गायकवाड यांना गावातीलच चार जणांनी जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज व काठीने मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी फिर्यादीनं 31 ऑगस्ट रोजी दिलेल्या तक्रारीवरून आरोपींवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.