जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथे कुंभार आणि कोळी समाजासाठी प्रत्येकी २०-२० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या दोन सामाजिक सभागृहांचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रविवारी २४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यावेळी बोलताना पाटील यांनी समाजाच्या विकासासाठी सभागृहांचे महत्त्व अधोरेखित केले.