नंदुरबार तालुक्यातील वावद शिवारातील विहिरीत विवाहिता महिला ममता गणेश हरदास हिने आपल्या दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केली होती. सासरच्या जाचाला कंटाळून ही आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी १० मे रोजी दुपारी तालुका पोलीस ठाण्यात पती गणेश हरदास सासू मुक्ताबाई हरदास या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.