विरार येथील श्री गणेश को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी या इमारतीच्या सदनिकेचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सदनिकेचा स्लॅब अचानक कोसळला. स्लॅब अंगावर कोसळून दोनजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.