वसई विधानसभा क्षेत्रातील चोळणा, विशाल नगर, कृष्णा टाऊनशिप, सी कॉलनी, एस कॉलनी, एव्हर शाईन या परिसरात अतिवृष्टीमुळे पाणी साचले, नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी या अतिवृष्टीग्रस्त भागाची महापालिका अधिकाऱ्यांसह पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. पाणी उपसा करण्यासाठी पंपिंग यंत्रणा कार्यान्वित करण्याचे, नालेसफाई गतिमान करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी आमदारांनी दिले.