माढा तालुक्यातील कुरडू येथील परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डायरेक्ट त्या कार्यकर्त्यांनी फोन केला नाही तर मध्यस्थी यांच्या दबावामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना फोन केला होता, अशी प्रतिक्रिया माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली आहे. आज रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ते माळशिरस येथे पत्रकारांशी बोलत होते.