पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मणिपूर दौऱ्याबद्दल शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज शनिवार दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ च्या सुमारास प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधानांचा ईशान्य दौरा अनेक अर्थांनी ऐतिहासिक आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे मणिपूरमध्ये दीर्घकाळ चाललेला जातीय हिंसाचार शांत झाला आहे आणि आज या प्रदेशात शांततेचे वातावरण आहे.