कोरा परीसरात मंगळवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे नदिनाले तुटुब पाहत असुन या नदी नाल्यांचे पाणी लालनाला प्रकल्पात वाहुन गेल्याने लालनाला प्रकल्पात तुटुब भरला असुन बुधवारी दुपारी १२ वाजता कोरा परीसरात जोरदार पावसाने हजेरी लावली सकाळपासून लालनाला प्रकल्पाचे ४ गेट ५० सेंटीमीटर व १ गेट ४० सेंटिमीटरने उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरू असलेल्या हिंगणघाट चिमुर मार्गावरील पुलावरून ३ ते ४ फुट पाणी वाहत असल्याने हा मार्ग रात्रीपासून वाहतुकीकरीता पुर्ण बंद झाली आहे.